पुणे

#CleanRiver  मुळा नदीतील जलपर्णीकडे महापालिकेचे साफ दुर्लक्ष

सकाळवृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या तलावांमध्ये जलपर्णी नसताना ती काढण्यासाठी २३ कोटी रुपयांची बनावट निविदा काढणाऱ्या महापालिका प्रशासनाचे मुळा नदीतील जलपर्णी काढण्याकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नदीत जागोजागी जलपर्णी पसरूनही ती का काढली जात नाही, असा प्रश्‍न आहे. 

खरे पाहता, याच नदीतील जलपर्णी काढण्यासाठी गेल्या काही महिन्यांसह चार वर्षांत तब्बल पावणेचार कोटी रुपये खर्च झाले आहेत. या वर्षीही येथील जलपर्णी काढण्याकरिता ८ कोटींच्या निविदा काढण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाच्या पातळीवर सुरू होत्या. परंतु, ती निविदा वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता असल्याने काढण्यात आली नव्हती. परंतु, या कामासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात जवळपास ६३ लाखांची तरतूद होती. ती खर्च केल्याचे दाखविले आहे; मग पुन्हा जलपर्णी कशी उगवली, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. जलपर्णींची जबाबदारी आधी आरोग्य खात्याकडे होती. परंतु, या कामासाठी काही वाहने वापरली जात असल्याने हे काम आता वाहन खात्यामार्फत केले जाते. आता आपली प्राथमिक जबाबदारी नसल्याचे सांगत वाहन खात्याने हात झटकले आहेत.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT